आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद निवडणूक:महाआघाडीचा घोळ कायम, 5 की 6 जागा लढायच्या यावर होईना एकमत

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 11 मे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

२१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने आपले चार उमेदवार घोषित केले आहेत. सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीत मात्र ५ जागा लढवायच्या की ६ वा उमेदवार मैदानात उतरवायचा यावरून घोळ काही थांबत नाही. 

यासंदर्भात महाआघाडीच्या नेत्यांची शुक्रवारी रात्री बैठक पार पडली. त्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पाच की सहा जागा लढायच्या याचा तिढा कायम आहे. एकूण संख्याबळानुसार भाजपचे ४, शिवसेना २, राष्ट्रवादी २ आणि काँग्रेस १ जागेवर निवडून येणार आहेत. 

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच फौजिया खान निवडून गेल्या होत्या. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसने तेव्हा मदत केली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीने आम्हाला सहकार्य करावे, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीने २ जागा लढविण्याची तयारी केली आहे. शिवसेनेने २ उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे आम्हीही २ जागा लढवण्यावर ठाम आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे म्हणणे आहे. 

राष्ट्रवादीकडून मिटकरी, शिंदे : ११ मे रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रविवारपर्यंत याप्रकरणी महाविकास आघाडीला तोडगा काढावाच लागणार आहे. १४ मे रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून २१ मे रोजी मतदान आहे. राष्ट्रवादीतून शिशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचे नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसमधून सचिन सावंत आणि मोहन जोशी यांची नावे पुढे येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...