आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप विधान परिषदेच्या ४ जागा लढवणार असून इच्छुकांची यादी राज्यस्तरीय समितीने केंद्रीय समितीला पाठवली आहे. कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय समिती घेईल. त्यांच्याकडून नावे आल्यानंतर आम्ही उमेदवारांना एबी फॉर्म देऊ, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती देऊन सूत्रांनी सांगितले, विधानसभेच्या वेळी खडसेंच्या मुलीला तिकीट दिले. परंतु त्यांचा पराभव झाला. त्यातच खडसेंनी गोपीनाथ गडावर चंद्रकांत पाटलांसमोरच देवेंद्र फडणवीस व अध्यक्षांवर टीका केली होती. केंद्रीय नेतृत्वाला ही बाब आवडलेली नाही. त्यामुळे खडसे इच्छुक असले तरी त्यांचा पत्ता पुन्हा कट होण्याची शक्यता आहे. भाजपने विधानसभेच्या वेळी अनेकांना आश्वासने दिली होती. ती आता पूर्ण करावी लागतील. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, इच्छुकांची नावे त्यांना उमेदवारी का द्यावी, या नोटसह केंद्रीय समितीला पाठवली आहेत.
भाजप विधान परिषदेच्या ४ जागा निवडून आणण्याच्या प्रयत्नात
विधानसभेतील संख्याबळ पाहाता भाजप ४ जागा निवडून आणू शकते. स्मिता वाघ, पृथ्वीराज देशमुख, अरुण अडसड हे आमदार निवृत्त झाले आहेत. वाढलेल्या आमदारांमुळे भाजपला १ जागा जादा मिळेल. ४ जागांसाठी ८ ते १० जण शर्यतीत आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रकाश मेहता, माधव भंडारी ही नावे चर्चेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.