आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा भाजपवर निशाणा:'कोण कौरव, कोण पांडव हे त्यांचे त्यांनीच ठरवावे, महाभारतही तिकडेच आहे', पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा भाजपला टोला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर बोलताना पंकजा मुंडे यांनी पाच पांडवांचे उदाहरण दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रिय मंत्रिमंडळाचा नुकचा विस्तार केला. यामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्यात आल्याने मुंडे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे पाहायला मिळाली. त्यांनी राजीनामा सत्र सुरू केले होते. दरम्यान आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंच्या वरळी येथील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पंकजा मुंडेंनी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे फेटाळत त्यांना धीर दिला आहे.

पंकजा मुंडे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे सांगितले आहे. तसेच कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर भाष्य केले आहे. यानंतर पंकजा मुंडे यांच्या कौरव पांडवांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधला.

काय म्हणाले वडेट्टीवार?
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले की,'कौरव कोण, पांडव कोण हे आता त्यांचे त्यांनीच ठरवावे. त्यांचे सैन्य, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचेच आहे आणि महाभारतही तिकडचेच आहे, ते त्यांनाच लखलाभ' असा टोला वडेट्टीवारांनी भाजपला लगावला.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर बोलताना पंकजा मुंडे यांनी पाच पांडवांचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या की, 'पाच पांडव जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो खरंच चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करते. जो चांगला असतो तो लोकांच्या भल्यासाठी युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. माझीही तीच भूमिका आहे. कौरवांच्या सेनेतील अनेक लोक मनाने पांडवांच्या सोबत होते. फक्त शरीरानं कौरवांच्या सोबत होते हे विसरू नका' असे म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे पक्षातील विरोधकांवर निशाणा साधला. मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...