आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांवर टीका:'राज्यपालांचे वर्तन गीनिज बुकमध्ये नोंद करण्यासारखे' विजय वडेट्टीवारांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीकास्त्र

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावावरुन डिवचले होते

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंदिरे खुली करण्यावरुन शाब्दीक चकमक रंगली होती. राज्यपाल राजकारणात ढवळाढवळ करतात म्हणून कोश्यारींवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. आता काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले की, राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी आहे. यासोबतच विद्यमान राज्यपालांइतकी वादग्रस्त भूमिका आजपर्यंत कोणत्याच राज्यपालांनी घेतलेली नसल्याचेही ते म्हणाले. त्यांनी ज्या रंगाचा, ज्या भावनेचा, ज्या विचारांचा चष्मा घातला आहे, तो त्यांनी काढावा, अशी महाराष्ट्राची भूमिका आहे असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

पत्रात काय म्हणाले होते राज्यपाल?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावावरुन डिवचले होते. हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कोणतीही दैवी सूचना मिळतेय की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होता, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली? आहे' असा उपरोधिक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी विचारला होता.

यावर कडाडले उद्धव ठाकरे
'माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही असे म्हणत त्यांनी राज्यपालांना सुनावले आहे.

हिंदुत्वाविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. तसेच हिंदुत्वाविषयी तुम्हाला असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपणास वाटते का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? असा उलट सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...