आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो असे विधान केले होते. त्यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री पदासाठी जात, पात, धर्म, पंथ आदी बघू नये. ज्याच्यात क्षमता आणि विकासाची दृष्टी आहे. जो महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ शकतो. त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्री कोणत्या जातीचा असावा आणि कोणत्या धर्माचा असावा हे म्हणत विष पेरू नये. मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस दोघांचा कारभार जनतेने पाहिला आहे. ज्याच्या नशिबात राजयोग आणि विकासाची दृष्टी असेल तो मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्रातील जनतेला आनंद आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
काय म्हणाले होते दानवे?
3 मे रोजी जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना दानवेंनी ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचे पाहू इच्छितो असे वक्तव्य केले होते. मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही. ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. या देशाला दिशा देण्याचे काम आपण सर्व (ब्राम्हण) समाजाने केले आहे, असे दानवे म्हणाले होते. याशिवाय, महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने आमच्याकडे लक्ष ठेवा. वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणांना प्रतिनिधित्व द्या. एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महापालिकेमध्ये निवडणून द्या, असे आवाहनही दानवे यांनी केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.