आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मोठी कारवाई:गँगस्टर विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक, महाराष्ट्र एटीएसची धडक कारवाई

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
विकास दुबे (डावीकडे) आणि गुड्डन त्रिवेदी (उजवीकडे) राजकारणात सक्रिय होते. त्रिवेदीच विकासची राजकारण्यांशी ओळख करवून द्यायचा.
  • हे दोघेही कानपूरातील 8 पोलिसांच्या हत्याकांडात सहभागी होते आणि घटनेनंतर फरार होते
  • शुक्रवारी सकाळी कानपूरजवळील एन्काउंटरमध्ये विकास दुबे ठार झाला होता

गँगस्टर विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर आता त्यांच्या साथीदारांना मागावर आहेत. विकास दुबेच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्राईव्हर सोनू तिवारी या दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली. हे दोघेही कानपूरमधील पोलिसांच्या हत्याकांडातील आरोपी होते. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांनी ही कारवाई केली. गुड्डन त्रिवेदी राजकारणात सक्रीय होता आणि त्याने विकास दुबेची अनेक मोठ्या नेत्यांसोबत भेट घडवून दिली होती असे म्हटले जात आहे. 

दोन्ही आरोपी अशाप्रकारे महाराष्ट्र एटीएसच्या हाती लागले

एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसच्या जुहू युनिटला मुंबई आणि ठाण्यात विकासचे काही साथीदार लपल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक आणि एनकाउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वात एक टीम तयार करण्यात आली. या टीमने आज सकाळी ठाण्यातील कोलशेत रोडवरील एका घरावर छापा मारत गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारीला बेड्या ठोकल्या. 46 वर्षीय त्रिवेदी याच्यावर 2001 मध्ये राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येच्या कट रचल्याचा देखील आरोप होता. 

15 जून रोजी विकास दुबेने त्रिवेदींच्या दुकानाचे केले होते उद्घाटन  

गुड्डन त्रिवेदीची राजकारण चांगली ओळख असल्याचे म्हटले जाते. विकास दुबेने 15 जून रोजी गुड्डनच्या हार्डवेअरच्या दुकानाचे उद्घाटन केले होते. याचा एक फोटो देखील समोर आला होता. रविवारी रात्री पोलिसांनी गुड्डनच्या घरी छापा टाकला होता. मात्र तो परिवारासोबत फरार झाला. 

घटनेनंतर गुड्डन विकासच्या संपर्कात होता

जगनपुरा भागातील जिल्हा पंचायत सदस्य असलेला गुड्डन द्विवेदी रुरा भागातील रहिवासी आहे. रूरात त्याचे हार्डवेअरचे मोठे दुकान आहे. एक आठवड्यापूर्वी गुड्डनच्या भाचीच्या लग्नात विकासने हजेरी लावली होती. पोलिस हत्याकांडानंतर गुड्डन विकास दुबेच्या संपर्कात होता असे सांगितले जात आहे. 

ग्वाल्हेरहून दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली

पोलिसांनी याआधी कानपूरच्या बिकरू नरसंहार प्रकरणी ग्वाल्हेरच्या दोन जणांना अटक केली होती. विकास दुबेचे साथीदार शशिकांत पांडेय आणि शिवम दुबे यांना शरण दिल्याचा दोघांवर आरोप आहे. ओम प्रकाश पांडे आणि अनिल पांडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पण ग्वाल्हेर पोलिसांनी अद्याप याची खातरजमा केली नाही. दरम्यान विकासचे दोन्ही साथीदार शशिकांत पांडेय आणि शिवम दुबे अद्याप फरार आहेत. 

0