आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना नियमांचे उल्लंघन:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मलबार पोलिस ठाण्यात तक्रार

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात राजकीय भूकंप आला असून, महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली, अशी माहिती नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी देखील दिली होती. असे असताना काल संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ताजिंदर बग्गा या दिल्लीच्या व्यक्तीने मलबार हिल या पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बग्गा यांनी ऑनलाइन पध्दतीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे यांना काल कोरोनाची लागण झाली होती. याची माहिती काँग्रेसचे नेते कमलनाथ आणि सर्व माध्यध्यांनी दाखवले. असे असतानाही उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडताना कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यामुळे त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले. अशी तक्रार बग्गा यांनी दिली आहे.

अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह

उद्धव ठाकरे यांची कोरोना अँटिजन टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पण आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना कोरोना झाला की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. काही काळाने पुन्हा एकदा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानंतरच ते पॉझिटिव्ह आहेत की नाही याबाबत चित्र स्पष्ट होईल.

राज्यात राजकीय संकट

उद्धव ठाकरेंवर नाराज असलेल्या शिवसेना व मित्रपक्षातील आमदार माेठ्या संख्येने एकनाथ शिंदेंकडे जात आहेत. ठाकरेंचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह चार आमदार बुधवारी गुवाहाटीत दाखल झाले आहेत, तर अन्य सहा जण गुरुवारी सकाळी विशेष विमानाने सुरतहून जाणार आहेत. शिंदेंकडे आता 45 पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ झाले.

बातम्या आणखी आहेत...