आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील निर्भया घटनेची पुनरावृत्ती:30 वर्षीय महिलेवर रात्री 3 वाजता सामूहिक बलात्कार, प्रकृती चिंताजनक असताना रुग्णालयात दाखल, एका आरोपीला बेड्या

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील साकीनाका भागात एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तीच्यावर सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदरील घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री तीन वाजता घडली आहे. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवले. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक बनली आहे. पोलिसांनी पीडित महिलेला आज सकाळी खैरानी रस्त्यावरून उचलून आणले आहे.

महिलेच्या खासगी अवयवात जखम
डॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या अंतर्गत भागात जखम झाली आहे. महिलेचे आॅपरेशन करण्यात आले असून तीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहन चव्हाण अशी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...