आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलटतपासणी:भीमा कोरेगावचा हिंसाचार वेळीच थांबवला गेला नाही, शरद पवार यांचे प्रतिपादन, फडणवीस सरकारवर ठेवला ठपका

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर गुरुवारी (दि. ५) जबाब नोंदवण्यात आला. कोरेगाव भीमा (जि. पुणे) हिंसाचार हे पोलिसांचे अपयश असून सदर हिंसाचार थांबवण्याची त्या वेळच्या सरकारची राजकीय इच्छाशक्ती नव्हती, अशी साक्ष शरद पवार यांनी दिली. या साक्षीतून पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचाराचा ठपका भाजप-सेना युतीच्या तत्कालीन फडणवीस सरकारवर ठेवला.

पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर दंगल उसळली होती. या प्रकरणाचा तपास एनआय करत आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आयोग गठीत केला होता. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे आज पवार यांनी आयोगाकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. आयोगातर्फे अॅड. आशिष सातपुते यांनी पवारांना प्रश्न विचारले

राजद्रोहाच्या कलमासंबंधात पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून हे कलम कालबाह्य झाले असून त्याचा गैरवापर होत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते. जर कोणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल व कोणी असामाजिक घटक येऊन तिथे तणाव निर्माण करत असतील तर त्याची जबाबदारी कोणाची आहे, या प्रश्नावर, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. असामाजिक घटकांनी राज्याची शांतता भंग करू नये, यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...