आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरार रुग्णालयात भीषण आग:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक, मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांच्या मदत निधीमधून मिळणार दोन लाखांची मदत

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नातेवाईकांचा आरोप - आग लागल्यावर स्टाफ रुग्णांना सोडून पळून आला

राज्यात कोरोनाने कहर केला असतानाच दुर्घटनांच्या घटनाही सुरूच आहेत. राज्यात मृत्यू तांडवर सुरू आहे. बुधवारी नाशिकमधील रुग्णालयामध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने 22 जणांचा तडफडून मृत्यू झाला. यानंतर आता आज अजून एका दुर्घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. वसई-विरारमधील कोविड रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच मृतांच्या नातेवाईकांना दोन-दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ही घटना दुःखद आहे. या घटनेत जीव गमावणाऱ्या लोकांप्रति मला संवेदना आहेत. जखमींनी लवकरच बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मदत निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना दोन-दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच दुर्घटनेत गंभीररित्या जखमी लोकांना 50 हजार रुपये दिले जातील. या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही दुःख व्यक्त केले आहे. तर महाराष्ट्र सरकारने जीव गमावणाऱ्या लोकांसाठी 5-5 लाख रुपयांची घोषणा केली आहे.

पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड सेंटरच्या अतिदक्षा विभागाला (ICU) आग लागल्याने 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. या घटनेदरम्यान आयसीयूमध्ये 15 आणि संपूर्ण रुग्णालयात 90 रुग्ण उपचार घेत होते. यापैकी ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या 21 रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

नातेवाईकांचा आरोप - आग लागल्यावर स्टाफ रुग्णांना सोडून पळून आला
रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, ही आग लागली तेव्हा हॉस्पिटलचा स्टाफ रुग्णांना आत सोडून बाहेर पळाला होता. अशा वेळी त्यांनी स्वतः आत जाऊन रुग्णांना काढण्याचा प्रयत्न केला होता. असे बोलले जात आहे की, या घटनेवळी ICU मध्ये दोन नर्स उपस्थित होत्या. तर रुग्णालयाचे CEO दिलीप शाह यांनी दावा केला की, रात्री रुग्णालयात डॉक्टर होते. मात्र त्यांना विचारले की, दुर्घटनेवेळी एकूण किती स्टाफ ड्यूटीवर होता ते योग्य आकडा सांगू शकले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...