आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Virtual Convocation : Neither Students Nor Chief Guests Came To The IIT Bombay Campus, 3D Avatars Of 1255 Students Took Degrees From Virtual Platform

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हर्च्युअल दीक्षांत समारंभ:आयआयटीत विद्यार्थी आले ना प्रमुख पाहुणे, व्हर्च्युअल मंचावरून विद्यार्थ्यांनी स्वीकारली थ्रीडी रूपात पदवी; प्रमुख पाहुण्यांचे भाषणही व्हर्च्युअल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात पहिल्यांदा व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्राने दीक्षांत समारंभ, तज्ज्ञ विद्यार्थ्यांनी 5000 तास तयारी केली, अॅपही बनवले

कोरोना संकटात आयआयटी बॉम्बेने रविवारी ५८ वा दीक्षांत समारंभ व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानाद्वारे आयाेजित केला. १२५५ पेक्षा जास्त विद्यार्थी घरीच होते आणि त्यांच्या अॅनिमेटेड रूपाला आभासी मंचावर अॅनिमेटेड दिग्दर्शक सुभाशिष चौधरी यांच्याकडून पदवी स्वीकारताना बघत होते. प्रमुख पाहुणे नोबेल विजेते डंकन हाल्डेन यांच्या थ्रीडी रूपाने पदक प्रदान केले. देश आणि आयआयटीच्या ६२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा दीक्षांत समारंभ झाला. जगभरात अनेक दीक्षांत समारंभ ऑनलाइन झाले, मात्र अशा प्रकारे झाला नाही. विद्यार्थी एका मोबाइल अॅपद्वारे समारंभात सामील झाले. हीच आयआयटी जूनमध्ये ऑनलाइन व्याख्यान देणारी पहिली संस्था झाली होती.

प्रमुख पाहुण्यांचे भाषणही व्हर्च्युअल

> दिग्दर्शक चाैधरी यांच्यानुसार महामारीदरम्यानही आम्हाला विद्यार्थ्यांना अविस्मरणीय अनुभव द्यायचा होता. मुख्य अभियांत्रिकी संस्थेतून उत्तीर्ण होण्याच्या अभिमानापासून त्यांना वंचित ठेवायचे नव्हते.

> भाैतिकशास्त्राचे २०१६ चे सहनोबेल विजेते प्रिन्स्टन विद्यापीठाचे प्रा. हाल्डेन यांनीही व्हर्च्युअली मार्गदर्शन केले. ते म्हणाले, यातून जगाला शिकायची गरज आहे. बदलत्या वातावरणात भारत नवनवे प्रयोग करत जगासमोर मजबूतपणे ताकद दाखवत आहे.

जगात पहिल्यांदा व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्राने दीक्षांत समारंभ

> २० तज्ज्ञ विद्यार्थ्यांनी २ महिने तयारी केली. ५००० तास परिश्रम घेतले.

> कार्यक्रमासाठी विशेषपणे मोबाइल अॅप तयार केले.

> एक दिवस आधी पालकांसाठी व्हर्च्युअल कॅम्पस टूर आयोजित.

> समारंभ यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि डीडी सह्याद्रीवर प्रसारित.