आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंबिवलीकर तरुणाच्या विक्रमी धावेची गिनिज बुकमध्ये नोंद:61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावला,यापूर्वीच्या एका धावपटूचा विक्रम मोडीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डोंबिवलीतील एका 29 वर्षीय व्यक्तीने आपल्या विक्रमी धावेची गिनिज बुकमध्ये नोंद केली. सलग 61 दिवस दररोज 42.195 किलोमीटर तो धावला आहे. विशाक कृष्णस्वामी असे या तरुणाचे नाव आहे. डोंबिवलीतील घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात या तरुणाचा हा धावण्याचा उपक्रम सुरू होता.

विमा कंपनीत काम करणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने विश्वविक्रम केल्यावर लगेचच KDMC आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. अग्निशमन दलाच्या पथकाने दोन मिनिटे सायरन वाजवून मानवंदना दिली.सात वर्षापूर्वी विशाकला धावण्याची आवड निर्माण झाली. विशाकने धावणे सुरु केले. अनेक स्पर्धेत भाग घेत त्याने त्या स्पर्धा जिंकल्या आहेत.

प्रतिस्पर्ध्याचा विक्रम मोडला

1 सप्टेंबरपासून दररोज पहाटे साडे तीन वाजता विशाक सावळाराम महाराज क्रीडासंकुलात धावण्यासाठी येत होता. आज 61 व्या दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी त्याने 42 किलोमीटर धावण्याचा आपला विक्रम पूर्ण करुन प्रतिस्पर्ध्याचा विक्रम मोडला आहे. दररोज 41.195 किमी 60 दिवसात धावण्याचा विक्रम करुन भारतामधील अशीष कासोडेकर यांनी गिनिज बुकात नोंद केली आहे. हा विक्रम विशाक कृष्णस्वामीने मोडला आहे.

अटी व शर्तींचे पालन

गिनिज बुक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली धावण्याचा उपक्रम सुरू केला होता. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड व्यवस्थापनाला आपल्या उपक्रमाची पूर्व माहिती त्याने गिनिज व्यवस्थापनाला दिली होती. गिनिज व्यवस्थापनादेऊन च्या देखरेखीखाली विशाक दररोज धावत होता. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या संघांनी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन केल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...