आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:वाधवान बंधू प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी झाले पुन्हा कामावर रुजू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनचे नियम मोडत गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाला महाबळेश्वपर्यंतच्या प्रवासासाठी शिफारसपत्र दिले होते

लॉकडाऊनच्या काळात कपिल आणि धीरज वाधवान बंधूंसह २३ जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. याप्रकरणी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य आयुक्त मनोज सौनिक यांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केला होता.

कोणाच्या शिफारशीने नव्हे, तर केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान बंधूंना पत्र दिल्याची कबुली गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर दिली होती. याप्रकरणी गुप्ता यांना समज देण्यात आली असून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ताकीद देण्यात आल्याचे वृत्त आहे. लॉकडाऊनचे नियम मोडत गुप्ता यांनी वाधवान आणि त्यांच्या कुटुंबाला महाबळेश्वपर्यंत प्रवास करण्यासाठी शिफारसपत्र दिले होते.

बातम्या आणखी आहेत...