आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी:केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भोवती कित्येक तास फिरत होता संशयित, मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेतील एक गंभीर त्रुटी समोर आली आहे. मुंबई दौऱ्यात अमित शहा यांच्या अवतीभोवती एक 32 वर्षीय संशयित व्यक्ती तासनतास फिरत होता.

झेड प्लस सुरक्षा असूनही अमित शहा यांच्या जवळ एखादी अनोळखी व्यक्ती कशी काय गेली? कित्येक तास या व्यक्तीला कोणीच का हटकले नाही?, असे प्रश्न निर्माण झाले आहे.

धुळ्याचा आहे संशयित

मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर या व्यक्तीला अटक केली आहे. हेमंत पवार असे आरोपीचे नाव असून तो धुळ्याचा रहिवासी आहे.

गळ्यात गृहमंत्रालयाचे ओळखपत्र

पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, आंध्र प्रदेशच्या खासदाराचा पीए असल्याचे सांगत आरोपी निर्धास्तपणे अमित शहांभोवती वावरत होता. तसेच, गळ्यात त्याने गृहमंत्रालयाचे ओळखपत्रही घातले होते. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या घराबाहेर ब्लेझर घालून फिरताना दिसला.

खासदाराचा पीए असल्याचा बनाव

दरम्यान, आरोपीवर संशय आल्यानंतर मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता आरोपीने खासदाराचा पीए असल्याचा बनाव केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेतू काय?

दरम्यान, व्यक्ती अमित शहांच्या अवतीभोवती का फिरत होता? त्याचा हेतू काय होता? याबाबत अद्याप पोलिसांनी माहिती दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...