आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट म्युझियम:वानखेडेवर 10 हजार स्क्वेअर फुटांमध्ये असेल भव्य म्युझियम; एमसीए पहिली क्रिकेट संघटना

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आराखडा एमसीएच्या अपेक्स कौन्सिलमध्ये

मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) वानखेडे स्टेडियममध्ये संग्रहालय बनवू शकते. अशा प्रकारच्या या म्युझियममध्ये महान क्रिकेटपटूंच्या आठवणीतील वस्तू ठेवण्यात येतील. एमसीए पहिली भारतीय क्रिकेट संघटना बनेल, ज्यांचे स्वत:चे संग्रहालय असेल. हे १० हजार स्क्वेअर फुटांमध्ये बनेल. संग्रहालयाचा प्रस्ताव एमसीएचे माजी अध्यक्ष रवी सावंत यांनी बनवला आहे. यापूर्वी आयसीसी, बीसीसीआय व एमसीएचे प्रमुख शरद पवार यांनी या प्रकल्पाला अावश्यक अशी संवैधानिक परवानगी दिली आहे.

आता त्याचा आराखडा एमसीएच्या अपेक्स कौन्सिलमध्ये ठेवला जाईल. रवी सावंत यांनी म्हटले की, “एमसीए दीर्घ काळापासून क्रिकेटचे संग्रहालय बनवू इच्छित होती. मला संग्रहालयाचे महत्त्व तेव्हा कळले, जेव्हा मी कोठे तरी वाचले होते की, सुनील गावसकरने आपली विशेष स्कल टाेपी इंग्लंडच्या संग्रहालयाला दान केली होती. मला हे वाचून खुप दु:ख झाले होते. तेव्हा मला जाणवले की, आपण आपल्या देशात आठवणीतील वस्तूंचा ठेवा सांभाळू शकत नाही. संग्रहालय बनल्याने आपण युवा पिढीला आपल्या समृद्ध क्रिकेट इतिहासाबाबत अवगत करू शकतो. अाशा वाटते, लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि दोन वर्षांच्या आत तयार होईल. ‘