आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंदुजा कुटुंबात संपत्तीवरुन वाद झाल्याचे समोर आले आहे. हा वाद 83 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरुन सुरू झाला आहे. परंतू, ज्या पत्रावरुन हा वाद सुरू झाला आहे, ते पत्र 2014 चे आहे. चार भावांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या पत्रावरुन हिंदुजा भावंडांमध्ये वाद पेटला आहे. या पत्रात म्हटले आहे की, 'एका भावाकडे जितकी संपत्ती आहे, त्यावर इतर सर्व भावांचाही अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला आपला एक्झीक्यूटर म्हणून नियुक्त करेल.' त्यावर हे पत्र अवैध म्हणून घोषित करावं, या मागणीसाठी 84 वर्षांचे श्रीचंद हिंदुजा व त्यांची मुलगी विनू यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
लंडनच्या न्यायाधीशांच्या निर्णयानंतर समोर आला वाद
हा वाद मंगळवारी लंडनमधील एका न्यायाधीशाच्या निर्णयामुळे समोर आला. निर्णयात म्हटले की, तिघे भाऊ गोपीचंद, प्रकाश आणि अशोक यांनी हिंदुजा बँकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी पत्राचा उपयोग केला. ही असेट फक्त श्रीचंद यांच्या नावावर होती. न्यायाधीश म्हणाले, 'या पत्राचा कायदेशीररित्या कोणताही परिणाम होऊ नये, तसेच त्याचा वारसा पत्राप्रमाणे वापर केला जाऊ शकत नाही, अशी श्रीचंद हिंदुजा व त्यांची मुलगी विनू यांची भूमिका असून, तसा निर्णय न्यायालयानं द्यावा अशी त्यांची मागणी आहे.'
सुनावनी होऊ नये
या वादावर तिन्ही भावांनी म्हटले की, 'खटल्याची यापुढे सुनावणी होऊ नये. ही सुनावणी होणे हिंदुजा कुटुंबाच्या सिद्धांताविरोधा असेल. अनेक दशकांपासून हेच चालत आले आहे की, सर्व संपत्ती सर्वांची आहे. कोणत्याही गोष्टीवर एकाची मालकी नाही. आपल्या कुटुंबाचे हे मूल्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तिघांनी एका इमेलमध्ये म्हटले की, आम्हाला कुटुंबाच्या मूल्यांना जपायचे आहे. रुलिंगनुसार, जर हा दावा खरा झाला, तर श्रीचंद यांच्या नावावरील सर्व संपत्ती त्यांची मुलगी आणि जवळच्या कुटुंबाची असेल, ज्यात हिंदुजा बँकेतील भागीदारी सामील आहे.
जगातील श्रीमंतांपैकी आहे हिंदुजा
न्यायाधीश म्हणाले की, श्रीचंद यांच्याकडे आपल्या वकीलांना निर्देश देण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनी वीनू यांना आपल्याकडून कारवाई करण्यास सांगितले आहे. हिंदुजा कुटुंब जगातील श्रीमंत कुटुंबापैकी एक आहे. त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग हिंदुजा समुहातून आला आहे. वेबसाइटनुसार, आज जवळ-जवळ 40 देशांत फायनांस, मीडिया आणि हेल्थकेअरमध्ये हिंदुजा ग्रुप आहे. ब्लूमबर्गइंडेक्सनुसार, हिंदुजा कुटुंबाकडे 11.2 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.