आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादात सापडला आहे. राज ठाकरेंवर हनुमानाची कृपा आहे, म्हणून ते प्रभू श्री रामाच्या दर्शनाला येणार आहेत. जे कोणीही प्रभू श्री रामाच्या दर्शनाला येणार त्यांचे आम्ही रामभक्त म्हणून स्वागत करणार आहे, असे उत्तर प्रदेशमधील अयोध्येचे भाजप खासदार लल्लू सिंह यांनी म्हटले आहे. तर राज ठाकरेंनी मोदींच्या शरणात येऊन महाराष्ट्राचा विकास करावा असेही खासदार लल्लू सिंह यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्याला खासदार बृजभूषणांचा विरोध
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 5 जुन रोजी अयोध्या दौरा आहे. त्याचा हा दौरा वादात सापडला आहे, उत्तरप्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी काल मोठे शक्तिप्रदर्शन करत राज ठाकरेंबद्दल खालच्या शब्दात टीका केली होती. खासदार बृजभूषण सिंह म्हणाले की, राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येमध्ये पाऊल ठेवू देणार नाही.
राज ठाकरेंचा विरोध करण्यासाठी 5 लाख लोक उभे राहतील. राज ठाकरे विमानातून येवोत किंवा रेल्वेतून त्यांना उतरू देणार नाही. माफी मागितली तरच जनतेचा राग कमी होईल. राजकारणासाठी आम्ही हे करत नाही. हे जात, धर्माचे आदोलन नाही. राज ठाकरे माफी मागत नसतील तर त्यांनी महाराष्ट्रातच राहावे. आमची माफी मागितली नाही तरी चालेल मात्र संतांची माफी त्यांना मागावी लागेल. असा पावित्रा खासदार बृजभूषण यांनी घेतला आहे.
काय म्हणाले खासदार लल्लू सिंह?
राज ठाकरेंवर हनुमानाची कृपा आहे, म्हणून ते प्रभू श्री रामाच्या दर्शनाला येणार आहेत. जे कोणीही प्रभू श्री रामाच्या दर्शनाला येणार त्यांचे आम्ही रामभक्त म्हणून स्वागत करणार आहे, असे उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार लल्लू सिंह यांनी म्हटले आहे. तर राज ठाकरेंनी मोदींच्या शरणात येऊन महाराष्ट्राचा विकास करावा असेही खासदार लल्लू सिंह यांनी म्हटले आहे. तर आज राज ठाकरेंच्या दौऱ्याला अयोध्येचे भाजप खासदार लल्लू सिंह यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.