आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसेंविरुद्ध वॉरंट, एकनाथ खडसेंना वैद्यकीय कारणांमुळे दिलासा

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्याविरोधात मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारात कथित घोटाळ्यात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यांचा अटकपूर्व जामीन मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, एकनाथ खडसेंना वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे. खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या ते मुंबई रुग्णालयात दाखल आहेत.

काय आहे प्रकरण?
मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सर्व्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसूलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहारात राज्य सरकारच्या महसुलाचे सुमारे ६१ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून हा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...