आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरेंट जारी, 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज ठाकरेंनी भडकावू भाषण केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडल्याचा आरोप आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी बेलापूर न्यायालयाने वॉरेंट जारी केले आहे. 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांना येत्या 6 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.

6 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बाशी टोलनाक्याची तोडफोड केल्याचा आरोप राज यांच्यावर आहे. या प्रकरणाची बेलापूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे आता बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. तसेच, राज ठाकरे यांनी 6 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.