आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंचा इशारा:आम्ही आहोत आंबेडकरवादी; लागू नका आमच्या नादी : मंत्री रामदास आठवले

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नामांतर लढ्यातील योद्ध्यांचा आठवलेंच्या हस्ते मुंबईत सत्कार

आम्ही आहोत आंबेडकरवादी; लागू नका आमच्या नादी; आम्ही आहोत नामांतरवादी; सर करायची आहे आम्हाला मुंबईची गादी’ असा काव्यमय इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घाटकोपर पूर्वच्या माता रमाबाई आंबेडकरनगरातील शहीद स्मारक सभागृहात दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात नामांतर आंदोलनातील योद्ध्यांचा सत्कार नामांतराचे शिल्पकार म्हणून रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. विचारमंचावर सीमाताई आठवले, काकासाहेब खंबाळकर, गौतम सोनवणे, सभा अध्यक्ष डी. एम. चव्हाण मामा, चिंतामण गांगुर्डे, नंदू साठे, काका गांगुर्डे, जयंती गडा, संजय वानखडे, चंद्रकांत कसबे, चंद्रशेखर कांबळे, मुश्ताक बाबा, डॉ हरीश अहिरे, अॅड.आशा लांडगे, अभया सोनवणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा लढा हा ऐतिहासिक लढा ठरला. आमच्या अस्मितेचा लढा प्रेरणा देणारा लढा ठरला. भारतीय दलित पँथरने नामांतर लढ्यात मोठे योगदान दिले. शहीद पोचिराम कांबळे, जनार्दन मवाडे यांची नावे या नामांतर वर्धापन दिन ंकार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराला देण्यात आली होती. तसेच विचारमंचाला शहीद गौतम वाघमारे यांचे नाव देण्यात आल्याबद्दल संयोजकांचे कौतुक करून नामांतर लढ्यातील ज्ञात आणि अज्ञात शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नामांतर लढ्यात भीमसैनिकांच्या एका पिढीने आपल्या तारुण्याची होळी केली. जिवाची बाजी लावून नामांतर लढा लढल्याच्या आठवणी रामदास आठवलेंसह अनेक वक्त्यांनी सांगितल्या. नामांतर लढ्यात स्वार्थाचा त्याग करणारे कार्यकर्ते आंदोलनात उभे राहिले, याची आठवण रामदास आठवले यांनी सांगितली.

ढसाळ यांचा मरणोत्तर नामांतर याेद्धे म्हणून सत्कार

नामांतर लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल नामांतर आंदोलनातील योद्धे म्हणून रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, गौतम सोनवणे यांच्यासह दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ, दिवंगत प्रा. अरुण कांबळे या दिवंगत महनीय नेत्यांनाही मरणोत्तर नामांतर योद्धे म्हणून सन्मानित करण्यात आले. भारतीय दलित पँथरपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत अनेक नेत्यांचा या वेळी नामांतर लढ्यात सहभाग घेतल्याबद्दल नामांतर योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला. या वेळी मोठया संख्येने रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...