आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थसंकल्पातून राज्यातील कोणत्याच घटकाला फारसे काही मिळणार नाही. केवळ घोषणांचा अवकाळी पाऊस पाडण्याचे काम अर्थसंकल्पातून झाले. अर्थसंकल्पात भाजपला महाप्रसाद, शिंदे गटाला प्रसाद तर इतरांना थोडे -थोडे ‘पंचामृत’ मिळाले. यात सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा वाहून गेल्या . या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेची घोर निराशा झाली असून हा अर्थसंकल्प म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अनेक ओव्यांचा दाखला दिला होता. त्यामुळे पवार यांनीही "जिते नाही अन्न । मेल्यावरी पिंड दान ।। ही तो चाळवा चाळवी ।। केले आपणचि जेवी ।" ही तुकाराम महाराजांची ओवी ऐकवत अर्थसंकल्पात राज्याच्या सध्याच्या प्रश्नांवर कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे पवार यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून केवळ ४० आमदारांना संभाळण्यासाठी निधीची उधळण सुरु आहे. विधानसभेतील २८८ आमदारांपैकी केवळ ४० आमदारांसाठी सरकार काम करत आहे. यामुळे भाजप आमदारांची धुसफूस सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप पवार यांनी लगावला.
एकनाथ शिंदे, फडणवीसांच्या जिल्ह्यातच खर्च पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या सहा जिल्ह्यात जिल्हा नियोजन मंडळाचा निधी कमी प्रमाणात खर्च झाल्याचे आकडेवारसह सांगितले. ठाणे जिल्ह्यात केवळ ४२. टक्के निधी खर्च झाला आहे. सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्हा खर्चाच्या बाबतीत राज्यात बाराव्या स्थानावर आहे. फडणवीस पालकमंत्री असणाऱ्या नागपूर जिल्ह्यात १५. ६१ टक्के, वर्धा जिल्ह्याचा निधी १९. टक्के अमरावती जिल्ह्याचा १६.७७ टक्के व इतर जिल्ह्यात खर्च झाल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.