आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रीन स्टोरी:कापल्या जाणाऱ्या महावृक्षांचे उदय करतात पुनर्वसन, आतापर्यंत 2200 वृक्ष वाचवले

मनीषा भल्ला | मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 सप्टेंबरला गोव्याच्या अमरोलीत पडलेला 100 वर्षांपूर्वीचा एक वृक्षही उदय यांनी वाचवला. यासाठी परदेशी नागरिकांनी निधी जमवला होता.
  • वृक्ष वाचवण्याच्या जिद्दीपोटी स्थापन केली संस्था

उदय कृष्ण पेड्डीरेड्डी यांचे वृक्षांशी नाते इतके अतूट आहे की ते वृक्ष न कापता त्याचे एका जागेवरून दुसऱ्या जागी पुनर्वसन करतात. मग हा वृक्ष कितीही मोठा असो अथवा जुना. वाता फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी २०१० मध्ये हे कार्य सुरू केले होते. आजपर्यंत त्यांनी अशा २२०० हून अधिक वृक्षांना जीवदान दिले. उदय यांनी सांगितले, “मी एक कंत्राटदार आहे. २०२० मध्ये हैदराबादमध्ये एक पादचारी पूल उभारला जात होता. यात ६ वृक्ष कापावे लागणार होते. मी ठरवले की हे वृक्ष तोडले जाऊ देणार नाही. मी एक प्रयोग केला. जेसीबीने २० वर्षांपूर्वीचे वृक्ष एका जागेवरून दुसरीकडे नेऊन लावले. यात १६ पैकी १३ वृक्ष वाचले. येथूनच मला प्रेरणा मिळाली आणि मग माझी मोहीम सुरू झाली.’ उदय यांची संस्था केवळ सरकारी योजनेत येणारे वृक्षच वाचवते. ते सांगतात, सरकारला हे वृक्ष वाचवण्यात काहीही स्वारस्य नसते. यासाठी तीन वेळा कोर्टातही त्यांनी दाद मागितली होती.