आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू:मा​​​​​​​झगाव ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझगाव येथील स्थानिक क्रूझ टर्मिनल आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील मांडवा जेटीदरम्यान मंगळवारी नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. ही टॅक्सी सेवा नयनतारा शिपिंग प्रा. लि. मार्फत चालवली जाणार आहे. या गलबताला ‘नयन इलेव्हन’ असे नाव देण्यात अाले असून त्याची आसन क्षमता खालच्या डेकवर १४० आणि वरच्या बिझनेस क्लास डेकवर ६० अशी असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा आणि इतर अधिकारी या सेवेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. या वॉटर टॅक्सीने प्रवासी मांडव्याला अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत पोहोचतील. यासाठी खालच्या डेकसाठी ४०० तर बिझनेस क्लास डेकसाठी ४५० रुपये तिकीट (एकेरी प्रवास) आकारण्यात येत आहे. प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यापूर्वी माझगाव क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी १२ ऑक्टोबरला चाचणी घेण्यात आली होती. या नावेवर दोन ७५० एचपी व्हॉल्वो पेंटा हाय-स्पीड बसवण्यात आले आहे. त्याची कमाल गती २२ नॉट्स आहे. पण ते १५ नॉट्सच्या वेगाने प्रवास करेल, असे सांगण्यात आले. ही वॉटर टॅक्सी अालिशान आणि पूर्णत: वातानुकूलित असून वरच्या बाजूला दोन आणि खालच्या डेकवर चार शौचालये आहेत. देशांतर्गतच्या पहिल्या वॉटर टॅक्सीची क्रूझ टर्मिनल ते मांडवा ही सेवा सकाळी १०.३०, दुपारी १२.५० आणि दुपारी ३.१० वाजता, तर मांडवा ते टर्मिनलपर्यंत सकाळी ११.४०, दुपारी २ आणि ४.२० वाजता सेवा उपलब्ध असेल, असे कंपनीने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. प्रवासी टर्मिनल्सवर तिकीट खरेदी करू शकतात किंवा MyBoatRide.com द्वारे ऑनलाइन बुकिंगही करू शकतात, असे प्रवक्त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...