आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया स्फोटके प्रकरण:सचिन वाझेची एनआयए कोठडी आज संपणार; फाइव्ह स्टार हॉटेलमधून वाझे चालवत होता खंडणीचे रॅकेट, एका क्लब मालकाची तासभर चौकशी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉटेलमध्ये मुक्कामासाठी बनावट ओळखपत्रे व आलिशान कारचा वापर करत होता वाझे

अँटिलिया प्रकरणावरुन अटकेत असलेला मुंबई पोलिसातील निलंबित एपीआय सचिन वाझेची एनआयए कोठडी आज संपणार आहे. दरम्यान त्याला आज 11 वाजेच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी नेले जाईल. त्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रनेच्या एका विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रना मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी वाझेची अजून चौकशी करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एनआयए गुरुवारी अटक करण्यात आलेल्या मिस्ट्री वुमन मीना जॉर्ज आणि सचिन वाझेची समोरासमोर चौकशी करु शकते. त्यामुळे एनआयएकडून त्याच्या कोठडीत वाढ होण्याकरीता अपील करण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसांपासून शोध सुरु असलेली तरुणी ताब्यात

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अनेक गौप्यस्फोट केले आहेत. १५ दिवसांपासून शोध सुरू असलेल्या तरुणीला पकडण्यात एनआयएला यश आले आहे. सचिन वाझे जेथे खंडणी वसुलीचे कारस्थान रचायचा तो अड्डाही शोधण्यात आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे तिहारमध्ये कैदेतील एका अंडरवर्ल्ड म्होरक्याशी जुळत आहेत.

एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “नरिमन पॉइंटवरील एका पंचतारांकित हॉटेलमधून वाझे खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत होता. एका व्यावसायिकाच्या मदतीने त्याने १२ लाख रुपयांत १०० दिवसांसाठी हाॅटेलमधील रूम नं. १९६४ बुक केली होती. तो काही वादग्रस्त प्रकरणांत या व्यावसायिकाची मदत करत होता. वाझे फेब्रुवारीत खोट्या नावाने याच हॉटेलमध्ये थांबलेला होता. या प्रकरणात एनआयएने वाझेच्या संपर्कातील ३५ पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. त्यात डेप्युटी कमिशनर रँकपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील काही जणांना आगामी काळात अटकही केली जाऊ शकते.’ दरम्यान, एनआयएने गिरगावातील एका रेस्तराँवर छापा मारला. सूत्रांनुसार, हे रेस्तराँही वाझेचा अड्डा होता. येथून ६५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले अहोत.

जेजे शूटआऊटचा दोषी संशयात
२५ फेब्रुवारीला अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओची जबाबदारी स्वीकारणारा टेलिग्राम मेसेज तिहारमध्ये कैदेत असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या तहसीन अख्तरने पाठवला होता. तो तुरुंगातून अंडरवर्ल्डच्या एका पंटरकडून पोस्ट करवून घेण्यात आला होता. ती व्यक्ती मुंबईतील १९९२ मधील चर्चित जेजे शूटआऊट प्रकरणात दोषी आहे.

तरुणाची चौकशी, कागदपत्रे जप्त
एनआईएने मीना जॉर्ज या तरुणीला अटक केली आहे. ती ठाण्यातील मीरा रोडवरील ७/११ कॉम्प्लेक्सच्या एका फ्लॅटमध्ये राहत होती. हा फ्लॅट पीयूष गर्गचा आहे. ही जागा वाझेच्या घराजवळ आहे. येथून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आधी येथेच मीनाची चौकशी करून तिला नंतर एनआयएच्या कार्यालयात नेण्यात आले. मीना हीच वाझेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी मदत करत असल्याचा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...