आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • We Are Not Against Giving Reservation To Maratha Community, But There Should Be No Injustice To Other Communities: Congress Leader And Minister Vijay Vadettiwar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षणाचा तिढा:मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, पण इतर समाजावर अन्याय होता कामा नये : काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मताशी आपण सहमत नाही - वडेट्टीवार

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये इब्लूएस प्रवर्गामधून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय झाला. सारथीसाठी १३० कोटी, तर अण्णासाहेब पाटील महामंडळाला ४०० कोटी रुपये, देण्याची घोषणा मंगळवारीच सरकारने केली. काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पण ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजालाही मदत करायला हवी, अशी मागणी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी मला भेटून केली. लोकसंख्येनुसार निधी वाटप झाले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी महा विकास आघाडी सरकार त्यांच्या मागे ठामपणे उभे आहे. मराठा समाजाला काही द्यायला विरोध नाही, पण ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजालाही मदत करायला हवी, अशी मागणी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी मला भेटून केली. लोकसंख्येनुसार निधी वाटप झाले पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. इतर समाज घटक नाराज होता कामा नये. ओबीसी वर्ग सध्या सगळ्यापासून वंचित आहे. कोळी, माळी, धनगर समाज असा रोज कमावून खाणारा मोठा वर्ग आहे. ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळाला निधी देण्याची मागणीही असणार आहे.

खा. कोल्हेशी सहमत नाही :

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. ओबीसी समाजाने मन मोठे करावे, त्यामुळे मराठा समाजातील वंचितांना आरक्षण मिळेल, असे अमोल कोल्हे म्हणाले होते.

आरक्षणाला विरोध नाही, पण इतरांवर अन्याय नको

ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण नको, अशी आमची भूमिका आहे. ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी २७ टक्के आहे, त्यातील ८ टक्के आरक्षण भटक्या विमुक्तांसाठी आहे, त्यामुळे आरक्षण १९ टक्के आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, पण इतर समाजावर अन्याय होता कामा नये,’ असे वडेट्टीवार यांनी म्हणले आहे.

बातम्या आणखी आहेत...