आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही नाही त्यातले:'सागर'वर बैठका सोडाच, आमच्याकडून राजकीय परिवर्तनाच्याही हालचाली नाहीत; चंद्रकांत पाटलांनी केले स्पष्ट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जे काही सुरू आहे ही त्यांची अंतर्गत बाब आहे. सागर बंगल्यावर कोणत्याही बैठका सुरू नाहीत. आमच्याकडून राजकीय परिवर्तनाच्या हालचाली सूरू नाहीत, अशी स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांसमोर दिले.

म्हणे, नो कमेंट

चंद्रकांत पाटील म्हणाले, दोन ते तीन जुलैला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. त्याची पूर्वतयारी आम्ही करीत आहोत शिंदे गटासंबंधित न्यायालायाच्या निर्णयावर मी टिप्पणी करणार नाही. सागर बंगल्यावर कुठल्याही बैठका सूरू नाहीत. भाजपच्या कुठल्याही बैठकीचे मध्यवर्ती केंद्र प्रदेश कार्यालय असते. लोक सागर बंगल्यावर भेटायला जात आहे.

'ती' अंतर्गत बाब

चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेचे आमदार फुटत असतील तर ती त्यांची अंतर्गत बाब आहे. त्यांनी आमच्यावर आरोप केला. त्यांचे म्हणणे काहीही असू शकते. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, दानवेंनाच ते विचारा ते म्हणतात तसे काहीही नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगले नाही बोलण्यासारखे काहीच नसेल म्हणून शांत असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्हाला इतर कामे

चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेने काय तयारी करावी काय नको, एकनाथ शिंदे गटाने काय करावे हा त्यांची अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही. शिवसेनेच्या दोन गटात भाजपने काय करायला हवे? आम्हाला इतर खूप कामे आहेत.

कोणती महाशक्ती?

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाशक्ती कुठली, कोणता राष्ट्रीय पक्ष कोणता हे शरद पवारांनाच माहित आहे. एखाद्याला सुरक्षा देणे ही केंद्राची जबाबदारी आहे. कोणतेही राजकीय परिवर्तन अथवा त्यासंबंधी हालचाली सूरू नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

ईडी, सीबीआय स्वायत्त

चंद्रकांत पाटील म्हणाले, मातोश्रीवर उद्धव भेटले तेव्हा त्यांना भाजपच्या नाराजीबद्दल विचारावे. ईडी, सीबीआय स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे राऊत यांच्या वक्तव्याला महत्व नाही ते काहीही म्हणू शकतात.​​​​​​