आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • We Don't Have Any Proposal From Shiv Sena, We Don't Have Any Proposal To Shiv Sena, Explanation Given By Fadnavis After Chandrakant Patil's Statement

राजकारण:आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव नाही, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकार आणि युतीबद्दल वक्तव्य केलं होतं. राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत असे पाटील म्हणाले होते. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्रित येण्यास तयार आहोत. पण, जर निवडणूक होत असेल तर त्या एकत्रित लढणार नाही. असं ते म्हणाले होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडून आम्हाला कोणात प्रस्ताव नाही. यामुळे हा विषय आता आमच्यासमोर नाही. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

फडणवीस म्हणाले की, चंद्रकांत दादा जे बोलले ते एका प्रश्नाच्या उत्तरात बोलले आहेत. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की, आमचं आता ठरलंय की, आता आम्ही भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे. तसंच आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडून आम्हाला कोणात प्रस्ताव नाही. यामुळे हा विषय आता आमच्यासमोर नाही असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करत या विषयावर पडदा टाकला आहे.