आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे ट्विट काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. गोंदियात झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची साथ दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
भंडारा-गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला. राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. आम्ही जयंत पाटील व प्रफुल पटेल यांच्या बोलल्यानंतरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली, असे नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले.
भंडारा-गोंदियात असं काय घडलं?
भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. तर त्यापाठोपाठ गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी एकमेकांना मदत करण्याऐवजी विरोधातील भाजपच्या मदतीने सत्तेत भागीदारी मिळवली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडारा जि. प. त काँग्रेसने भाजपच्या नाराज गटाच्या मदतीने अध्यक्ष पद मिळवले. तर गोंदियात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना दे धक्का करत भाजपच्या मदतीने सत्तेत वाटा मिळवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.