आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पावसाळी अधिवेशन:त्यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांचा अजित पवारांना टोला

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधानपरिषद उपसभापती निवडीवर आमचा आक्षेप कायम, प्रवीण दरेकरांची भूमिका

विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुनर्नियुक्ती झाली. शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे विधान परिषदेच्या उपसभापती झाल्यानंतर आमचे सरकार आले. म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केल्याचे अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली असे ते म्हणाले.

पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी अद्यापही भाजप नेत्यांच्या मनात दिसत आहेत. “अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिले. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचे काय झालं? त्यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली” असा टोला दरेकर यांनी पवारांना लगावला.

विधानपरिषद उपसभापती निवडीवर आक्षेप कायम

दरम्यान सरकारची भूमिका हट्टाची आहे. गुरुवारी न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे, असे असतानाही ही निवडणूक घेतली. त्यामुळे विधानपरिषद उपसभापती निवडीवर आमचा आक्षेप कायम आहे, असे प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.