आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी मी स्वतःची सुटका केली, हा दावा खोटा आहे, देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खासगी विमानाने झाला. सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवल्याचा दावा करत शिंदे गटाने छायाचित्रेही अपलोड केली. गुरुवारी देशमुख म्हणाले, २० तारखेला शिंदे साहेबांनी गाडीत बसवले. आधी पालघर, नंतर गुजरातला नेले. तेथून गुवाहाटीला पाठवण्यात आले.
आम्हाला अंधारात ठेवून सुरतमध्ये नेल्याचा दावा कळंब-उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी केला. त्यावर आमदार तानाजी सावंत म्हणाले, पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली. प्रचंड पाऊस पडत असताना ४ किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा आहे. पाटील खोटं बोलून रचून मातोश्रीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.