आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरण:जायकवाडीचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करू, मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करू - जयंत पाटील

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न असून हे काम पूर्ण झाले तर मराठवाड्यातील पाणीटंचाई असलेल्या भागांना पाणी मिळेल. मराठवाड्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करायचे असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी शासनाचा जलसंपदा विभाग काम करत आहे. या उद्देशाने शासनाने अनेक कामे पूर्ण केली असून अनेक कामे सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. मंगळवारी विधानसभेत २६३ अन्वये अनुदान मागणीवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभेतील सर्व सदस्यांनी या चर्चेत भाग घेत चांगल्या सूचना केल्या. गोदावरी कालवा दुरुस्तीच्या कामाला महाविकास सरकारमध्ये गती मिळाली असून पुढील दोन वर्षांत मोठे काम होईल. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे.

कोविडच्या काळात आर्थिक चणचण असताना या प्रकल्पासाठी ८२३ कोटी ७२ लाख रुपये दिले गेले तर यंदाही २२-२३ यावर्षी ३६५ कोटींची तरतूद आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्याचे व उजव्या कालव्याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे निळवंडे काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...