आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामानाचा अंदाज:कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वाढणार पावसाचा जोर, पुढच्या तीन तासांमध्ये 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

राज्यात दडी मारलेल्या पावसानंतर पुन्हा मान्सूनने वापसी केली आहे. पाऊस पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील तीन तासांमध्ये काही राज्यांमध्ये मुसळधार सरी कोसळणार आहेत.

पुढील तीन तासांमध्ये मराठवाडा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसाच्या सरी बरसणार आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या सुधारीत माहितीनुसार, पुढील तीन तासात घाट परिसरात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच या परिसरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

मराठवाड्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. याठिकाणी ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...