आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामान खात्याचा अंदाज:पुढच्या दोन दिवसात राज्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 जानेवारीला दक्षिण कोकण, गोवा व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत ढगाळ वातावरण असल्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील तुरळक भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

6 जानेवारीला दक्षिण कोकण, गोवा व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर 7 जानेवारीला दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

गेल्या 24 तासातील पर्जन्यमान
गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडेच होते. मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण गोव्याच्या काही भागांमध्ये लक्षणीय वाढ झाली तर मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

बातम्या आणखी आहेत...