आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात गारठा, हुडहुडी वाढली:पुण्यात सर्वात कमी तापमान, बहुतांश ठिकाणी पारा 18 अंशांखाली पोहचला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनंतर राज्यात गारवा चांगलाच जाणवत असून हुडहुडी वाढली आहे. तर दुपारी तप्त वातावरण अशी स्थितीही आहे. आज (ता. एक) राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यापुढील दिवसांत राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यताही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

पारा 18 अंशांच्या खाली

राज्यात गारठा वाढू लागलाराज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 18 अंशांखाली आल्याने पहाटे गारठा वाढू लागला आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरू असून, दुपारी उन्हाचा चटका कायम आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे.

राज्यात गारवा

गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा वाढला असून, दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. यापुढे राज्यात हवामान आणखी थंड राहील असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले. किमान तापमान 20 अंशांखाली आल्याने पहाटे गारठा कायम आहे. तर दुपारी उन्हाचा तडाखाही सहन करावा लागत आहे.

राज्यात निरभ्र आकाश

नैऋत्य बंगालच्या उपसागरात उत्तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर या प्रणालीपासून केरळ, तमिळनाडू ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा जोर वाढणार असला तरी महाराष्ट्रात मात्र निरभ्र आकाश आहे.

पुण्यात सर्वात कमी तापमान

उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढत आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या थंडी वाढल्याचे चित्र आहे. सर्वात कमी किमान तापमानाशी नोंद पुण्यात करण्यात आली आहे. पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आहे.

आणखी थंडी वाढणार

सरासरीच्या तुलनेमध्ये तापमानात घट झाल्याने थंडी वाढली असून हवामान विभागांना दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आणि हिमालयीन पर्वतरांगांवर होत असलेल्या बर्फदृष्टीमुळे राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

  • IMD च्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात पुणे आणि लगतच्या भागात अशीच थंडी राहील.
  • पुढील काही दिवस रात्रीचे तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअसदरम्यान राहील.
  • दिवसा उन्हाचा पारा वाढलेला असेल तर रात्री आणि सकाळी थंडी जाणवेल

कोठे कसे तापमान?

मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 1.6 ते 3 अंश सेल्सिअसने कमी होते.

  • औरंगाबाद - 13 अंश सेल्सिअस
  • नाशिक -13.3 अंश सेल्सिअस
  • महाबळेश्वर 13.8 अंश सेल्सिअस
  • सातारा 14.3 अंश सेल्सिअस
  • नागपूर 14.8 अंश सेल्सिअस
बातम्या आणखी आहेत...