आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच आज मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळीच्या तडाख्याने बळीराजा आधीच उद्धवस्त झाला आहे. आणि त्यातच पुन्हा एकदा हवामान विभागानो जोरदार पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे.
एकीकडे वादळी पाऊस सुरू असतानाच, उन्हाचा चटका देखील वाढला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात पाऊस होणर असल्याची माहिती हवामान विभागने दिली आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत पंचनामे पूर्ण झालेले नाही. त्यातच अवकाळी पाऊस थांबायला तयार नाही. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडताना दिसून येत आहे.
पाऊस का पडतोय?
आग्नेय अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या परिस्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.
अल निनेचा प्रभाव
स्कायमेटकडून 2023 साठी मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. स्कायमेटकडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 94 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस 858.6 मिमी सरासरी राहण्याची शक्यता आहे. अलनिनोचा प्रभाव भारतीय मान्सुनवर होऊ शकतो. देशातील अनेक भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखीन भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.