आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पूरसदृश परिस्थिती:राज्यात एनडीआरएफच्या 20 टीम तैनात, पावसाच्या रेड अलर्टच्या काळात पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली बातचित

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईमध्ये फोर्ट, चर्चगेट, मरीन ड्राइव्ह, गिरराव, ब्रीच कँडी सारख्या परिसरात पाणी तुंबले आहे
  • हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज रेड अलर्ट जारी केला आहे

मंगळवारपासून मुंबईत सतत पाऊस पडत आहे. यामुळे संपूर्ण शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अद्याप पावसाचा रेड अलर्ट आहे. मदत व बचावासाठी महाराष्ट्रात 20 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. एकट्या मुंबईत 5 टीम काम करत आहेत. लोकांनी आज घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आणि एनडीआरएफ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. मुंबईत रात्रभर एनडीआरएफची टीम अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत राहिली. कामाच्या दिवसांमुळे आजही कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सर्वाधिक परिणाम मुंबईच्या या भागात दिसून आला
फोर्ट, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, गिरगाव, ब्रीच कँडी, पेडर रोड, हाजी अली यासारख्या भागात पाणी साचले आहे. चर्नी रोडमधील विल्सन महाविद्यालयासमोर, गिरगाव, बाबुलनाथ परिसर, पेडर रोड, बाल्केश्वर परिसरामध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी होते. यापैकी बर्‍याच भागात वीज गेली. जेजे रुग्णालयाच्या कॅज्युअलटी वॉर्डात पाणी शिरले आहे. दक्षिण मुंबईतील काही रुग्णालयांनाही पावसामुळे बाधा झाली आहे. जसलोक रुग्णालयाच्या इमारतीच्या काही फरशा पडल्या.

पंतप्रधानांनी शक्य तेवढ्या मदतीचे आश्वासन दिले
बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मुंबईतील बिघडलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. ठाकरे यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

स्टेडियम आणि स्टॉक एक्सचेंजचेही नुकसान झाले
वाऱ्याचा वेग इतका जोरात होता की जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे क्रेन पलटी झाली. त्याचप्रमाणे शेअर बाजाराच्या इमारतीवरील नावाचा बोर्ड तुटला आला. डीवाय पाटील स्टेडियमचेही नुकसान झाले आहे. त्यातील बर्‍याच रेलिंग उडाल्या. दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या हायमास्ट लाईटचे खांब जोरदार वाऱ्यामुळे हलताना दिसले.

एनडीआरएफने 290 प्रवाश्यांची सुटका केली
एनडीआरएफ आणि रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) दोन लोकल गाड्यांमध्ये अडकलेल्या 290 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर डझनभर लोक इस्टर्न फ्रीवेवर जवळपास साडेतीन तास ट्रॅफिकमध्ये अडकले होते. ते येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीला जाणार जात होते.

46 वर्षाचा पावसाचा विक्रम मोडला
बुधवारी मुंबईचा पाऊस वादळाच्या दिवसापेक्षा अधिक धोकादायक दिसत होता. 46 वर्षांनंतर ऑगस्टमध्ये 12 तासांत कुलाबामध्ये 294 मिमी पाऊस पडला. यामुळे अनेक वर्षांनी दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर बरेच पाणी साचले. ऑगस्टमध्ये 1974 मध्ये कुलाबात सर्वाधिक 262 मिमी पाऊस पडला होता. तर बुधवारी 293.8 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस बुधवारी आणखी वाढला. जोरदार वारे आणि पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले.

बातम्या आणखी आहेत...