आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:10 दिवसांच्या उपचारांनंतर घरी परतताना टाळ्यांनी झाले स्वागत; मात्र चार तासांमध्येच पाेलिसाचा मृत्यू

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासांत 114 पोलिसांना कोरोना, 2325 पॉझिटिव्ह

कोविड सेंटरमध्ये १० दिवसांचा उपचार घेतल्यानंतर घरी परतलेले पोलिस कॉन्स्टेबल दीपक हाटे यांचे कॉलनीतील नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. मात्र, त्यानंतर अवघ्या ४ तासांत त्यांचे निधन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दीपक हाटे हे वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. अडकलेल्या मजुरांना गावी पाठवण्यासाठी ज्या पोलिसांची ड्यूटी होती, त्यात दीपक यांचाही समावेश होता. यानंतर काहीच दिवसात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दीपक आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना वरळीतील राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आले होते. तेथे १० दिवसांचा उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास ते वरळी पोलिस कॅम्प भागातील घरी चालत आले. दरम्यान, त्यांचे शेजाऱ्यांसह कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. त्यांनीही सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घरी गेले. मात्र रात्री १ च्या सुमारास त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

२४ तासांत ११४ पोलिसांना कोरोना, २३२५ पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ११४ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत एकूण २३२५ पोलिस पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...