आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. जवळपास 200 पेक्षा जास्त जागांवर ममता बॅनर्जींचा पक्ष हा आघाडीवर आहे. यानंतर राज्यातील नेत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी सोशल मीडियावर म्हणाले की, 'या शानदार विजयासाठी ममता बॅनर्जी यांचेअभिनंदन! जनतेच्या कल्याणासाठी यासोबतच साथरोगामुळे समोर असलेल्या आव्हानाला सामूहिकरित्या सामोरे जाण्यासाठी आपले कार्य चालू ठेवूया' असे शरद पवारांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बंगाल आणि भाजपच्या निवडणुकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर ममता बॅनर्जींनीही पूर्णपणे कंबर कसून निवडणुकीची तयारी केली होती. आता यात ममता बॅनर्जींना आपला किल्ला राखता आला आहे. तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. सध्याच्या आकेडवारीनुसार, तृणमूल काँग्रेस 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला 100 चा आकडाही पार करता आलेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.