आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जी महाराष्ट्रात:मुंबईत पोहोचताच ​​​​​​​घेतले सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन, म्हणाल्या- मी सर्वांसाठी प्रार्थना करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आले होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.

ममता बॅनर्जी यांनी आज आपल्या दौऱ्याची सुरूवात करण्याअगोदर श्री. सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दरम्यान, ममता बॅनर्जी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हणाल्या, उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. मला इथे येऊन बरे वाटले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. मी खूप आनंदी आहे असं म्हणत ‘जय मराठा, जय बांग्ला’ नारा ममता बॅनर्जींनी दिला. बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते.

ममता बॅनर्जी यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर आता, या मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे देखील त्यांचे नियोजन होते, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक होणार आहे. तसेच सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांच्याही गाठीभेटी त्या घेणार असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...