आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई लोकल सेवा:पश्चिम रेल्वेत आजपासून 40 फेऱ्यांची वाढ, एकूण 202 फेऱ्या चालवण्याचा निर्णय 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास 3 महिन्यांपासून मुंबई लोकल बंद आहे. मात्र आता अनलॉक 1.0 मध्ये मुंबईत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी काही रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. यामधील उपगरीय लोकलच्या फेऱ्यांमध्ये पश्चिम रेल्वेने सोमवारीपासून 29 जून म्हणजेच आजपासून 40 फेऱ्यांची वाढ केली आहे. आता पश्चिम रेल्वेच्या एकूण 202 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीनंतर उपनगरीय लोकलमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

पश्चिम रेल्वेच्या नव्या 40 फेऱ्या असणार आहेत. त्या चर्चगेट ते बोरीवली दरम्याम 20 सेवा वाढवण्यात आल्या आहेत. बोरीवली आणि विरारदरम्यान डाऊन दिशेला धिम्या मार्गावर 2 अतिरिक्त फेऱ्या, वसई ते चर्चगेटदरम्यान अप दिशेला 2 जलद फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यासोबतच बोरीवली ते विरारदरम्यान अप दिशेला दोन धिम्या फेऱ्या, यासोबतच चर्चगेट ते विरारदरम्यान 14 जलद सेवा अशा एकूण 40 फेऱ्यांची वाढ करण्यातआली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यत आला आहे. 

0