आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंग्यावरून राज यांना इशारा:राज ठाकरेंची औकात काय? भोंग्याला हात लावले तर ते वापस कसे येतील ते बघा -मौलाना दौलत नद्वी

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे काहीह बोलले तरीही काहीच होणार नाही त्यांची औकातही काय? देवाने हात दिले आहेत ते खाण्या-पिण्यासाठी वापरा, भोंग्याला हात लावायला जे हात येतील ते हात कसे वापस जातील हे बघा असा इशारावजा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मौलाना दौलत नद्वी यांनी दिला. ते माध्यमांशी आज बोलत होते.

खिदमत ए मिल्लत यांनीही राज ठाकरेंनी अजाणला बांग म्हटले असून राज यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

नद्वी म्हणाले, मुस्लिम समाज मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही. चार तारखेचा अल्टीमेट त्यांनी दिला. त्याआधीही त्यांनी अल्टीमेटम दिला होता तेव्हाही आम्ही हेच म्हणालो होतो. राज सारखे लोक जगाच्या अंतापर्यंतही असे बोलत राहीले तरीही त्याचा उपयोग होणार नाही अशा शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका करीत त्यांना आव्हानही नद्वी यांनी दिले.

देवाने हात दिले ते खाणे पिण्यासाठी वापरा

उगाच भोंग्याच्या नादी लागू नका, देवाने हात दिले ते खाण्या-पिण्यासाठी राज यांनी वापरावे. मशिद, गिरीजाघर, मंदीरावरील भोंगे उतरवण्याची ते भाषा करीत आहेत त्यांनी या भोंग्यांना हात लावून तर पहावे जे हात भोंगे उतरवण्यासाठी येतील त्याची काय अवस्था होईल हे दिसून येईल असेही नद्वी यांनी इशारा दिला.

राज यांनी केले होते विखारी विधान

राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत बोलताना विखारी विधान केले होते. ते म्हणाले की, मशिदीवरील भोंगे उतरवायला हवे. यांना रस्त्यावर नमाज पठण करण्याचा अधिकार कुणी दिला. आवाज आला तर तोंडात बोळा कोंबा, विनंती करून समजतील तर ठिक अन्यथा एकदा होऊन जाऊद्या अशी चिथावणीही राज यांनी दिली होती.

राज यांना अटक करा आणि शांतता नांदवा

राज ठाकरे जातीयवादी असून ते हिंदुृ-मुस्लिमांत तेढ निर्माण करीत आहेत. ​​​​​राज यांना अटक करून महाराष्ट्रात शांतता नांदवा अशी मागणी संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाज यांनी केली आहे.

वंचितकडून गुन्हा दाखल करण्याची तयारी

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी आक्षेपार्ह विधान केले. राज ठाकरेंवर पोलिसांनी गुन्हा नोंदवावा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशाराही वंचितकडून देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...