आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • What Is The Meaning Of Mohit Kamboj's Tweet? Jai Shri Ram Tweets Tagging Vidya Chavan; Why Is The Leader Of NCP On The Radar Of Cambodians?

मोहित कंबोज यांच्या ट्विटचा अर्थ काय?:विद्या चव्हाण यांना टॅग करत जय श्री रामचे ट्विट; राष्ट्रवादीचे नेते कंबोज यांच्या रडारवर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी जय श्री राम असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांना टॅग केले आहे. तर यांनतर तासाभरात एक सूचक ट्विट त्यांनी केले आहे यात कुणाचे नाव नसले तरी या टविटचा रोख विद्या चव्हाण यांच्याकडेच असल्याचे दिसून येत आहे.

कंबोज यांचे ट्विट?

लगाम दिसत नसला तरी तोंडावर तो असला पाहिजे. विनाकारण आमच्याशी वाद उकरून काढलात तर मग तयार राहा. हा फक्त एक ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

गेली अनेक दिवस मोहित कंबोज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहे. याआधीही त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाई होणार असे टविट केले होते. यावरून ते जोरदार चर्चेत आले होते दरम्यान त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीलाच डिवचले आहे.

कंबोज याचे अजून एक ट्विट

यानंतर कंबोज यांनी अजून एक ट्विट केले आहे. यात मोहित कंबोज म्हणाले हे या लोकांनी सगळे घोटाळे केले आणि आता जेव्हा हे सर्व घोटाळे समोर येत आहे.

तेव्हा भाजपवर आरोप करण्याचा नवा धंदा यांनी सुरू केला आहे, असा आरोपही कंबोज यांनी केला आहे. तुम्ही जर काही चुकीचे केले नाही तर तुम्हाला कसली भिती आहे, चोराच्या मनात चांदणं असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ज्याचे घर काचेचे असते ते लोकांच्या घरांवर डगडं नाही मारत असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

विद्या चव्हाणांची केंद्रावर टीका?

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी शनिवारी बिल्किस बानो प्रकरणावरुन केंद्र सरकारवर टीका करताना याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आलंय, नुसतेच सोडले नाही तर त्यांना हार घालत मिठाई भरवण्यात आली. मर्दाला लढायचे असेल तर त्याने मैदानात लढावे.महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आम्ही विरोध करू, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...