आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्युसेक, टीएमसी म्हणजे काय?:कसा मोजतात धरणातील पाण्याचा साठा आणि विसर्ग, जाणून घ्या

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात यंदा मुसळधार पाऊस झाला आहे. बहुतांश ठिकाणी पावसाने सरासरीचे प्रमाणही ओलांडले आहे. त्यामुळे ठिकठिकाणाहून मुसळधार पावसासोबतच धरण भरल्याच्या, धरणातून पाणी सोडल्याच्या म्हणजेच पाण्याचा विसर्ग केल्याच्या बातम्या वारंवार आपल्या कानी येत आहेत.

एक हजार क्युसेक पाणी धरणातून सोडले, धरणात 100 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे, असे नेहमी आपण ऐकत, वाचत आहोत. मात्र, क्युसेक, टीमएमसी म्हणजे नेमके किती? याचा अंदाज अजूनही अनेकांना येत नाही. त्यामुळेच आज अतिशय सोप्या शब्दांत पाण्याचे प्रमाण मोजण्याची ही एकके समजून घेऊयात...

साचलेले पाणी आणि वाहते पाणी मोजण्याचे एकके वेगवेगळी आहेत. साचलेले पाणी आपण बहुतांश वेळा लीटरमध्ये मोजत असतो. तर, वाहते पाणी मोजण्याची दोन एकके आहेत.

1) क्युसेक
२) क्युमेक

क्युसेक म्हणजे काय?

धरणातून पाणी सोडताना पाण्याचे प्रमाण क्युसेकमध्ये मोजले जाते. 'क्युव + सेकंद = क्युसेक' अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. क्युसेकमध्ये पाणी घनफुटात मोजले जाते.

एक घनफूट प्रती सेकंद म्हणजेच एक क्युव पर सेकंद याचा अर्थ क्युसेक असा होतो.

म्हणजेच ज्यावेळी धरणातून 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यावेळी 1000 गुणिले 28.31 अशा पद्धतीने 28,310 लिटर पाणी प्रती सेंकदाला नदीपात्रात सोडले जाते.

क्युमेक म्हणजे काय?

क्युसेकमध्ये पाणी घनफुटात मोजले जाते. तर, क्युमेकमध्ये घनमीटरमध्ये मोजले जाते. एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. 1 क्युमेक पाण्याचा विसर्ग म्हणजे एका सेकंदात 1 हजार लीटर पाणी धरण किंवा नदीपात्राबाहेर पडते.

धरणातील पाणी कसे मोजतात?
धरणांमधील पाणी हे टीएमसीमध्ये मोजले जाते. ते कसे मोजतात हे पाहूयात...

प्रमुख धरणांची क्षमता टीएमसीमध्ये

बातम्या आणखी आहेत...