आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवादात आम्ही काय बोलावे? तो त्यांच्या घरचा प्रश्न : देवेंद्र फडणवीस

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचे
  • नातवाने आजोबांना आवडेल असे वागायचे की नाही हे नातवाने ठरवायचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत फटकारले होते. यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावे? हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, 'आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचे आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असे वागायचे की नाही हे नातवाने ठरवायचे आहे. त्यासंदर्भात मी काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी करायला माझी हरकत नाही असे शरद पवारांनी सांगितले आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...