आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांत स्वच्छतागृहांसाठी कसला मुहूर्त पाहताय?:धोरण नसल्याने हायकोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरले, स्वच्छतेबाबत सरकार उदासीन

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सरकारी शाळांत स्वच्छ शौचालये उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने सोमवारी धारेवर धरले. “विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार शाळांत स्वच्छतागृह उपलब्ध करण्याबाबत स्वतंत्र धोरण का आणत नाही? त्यासाठी मुहूर्ताची वाट पाहत आहात का?’ अशा शब्दांत कोर्टाने फटकारले.

न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. लॉच्या विद्यार्थिनी निकिता गोरे आणि वैष्णवी घोळवे यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना राज्यातील ग्रामीण भागांतील शाळांत भेटी देऊन तेथील स्वच्छतागृहांची स्थिती जाणून घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. प्राधिकरणाने अहवाल सादर केला.

त्यात 237 शाळांची पाहणी करण्यात आल्याचे आणि त्यातील 207 शाळांमध्ये अस्वच्छ स्वछतागृहे असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अहवालावरूनच न्यायालयाने सरकारला धारेवर धरत विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेबाबत तुम्ही किती उदासीन आहात, अशी टिप्पणी केली.

बातम्या आणखी आहेत...