आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी भाजपचा फुत्कार:ज्यांनी घर सोडलं नाही ते मैदानात काय उतरतील? संजय राऊतांच्या ट्विटला भाजपकडून प्रत्युत्तर

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा'' या विरोधकांना उद्देशून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या काही तास आधीच भाजपने खोचक ट्विट केले. मुख्यमंत्र्यांना उद्देशुन आणि संजय राऊत यांच्या ट्विटला उत्तर म्हणूव ''जिसने घर नहीं छोड़ा, वह क्या मैदान में उतरेगा'' अशा शब्दात भाजपने ट्विट केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बिकेसी मैदानावर सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विरोधी पक्षांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे एक ट्विट प्रसिद्धीस आले आहे. राऊत आणि मुख्यमंत्री ठाकरे एका खोलीतून हातात हात घालुन बाहेर पडतानाचे छायाचित्र अपलोड करून संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटनंतर काही वेळातच भाजपकडून सडेतोड उत्तर आले आहे.

काय आहे संजय राऊत यांचे ट्विट

''लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा; कूछ लोग भूल गये है.. अंदाज हमारा!!! जय महाराष्ट्र! आज क्रांतिकारी दिवस!!'' अशा शब्दात संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यांचा हा टोला विरोधकांना चांगलाच झोंबला आणि त्यांच्याकडूनही तसेच प्रत्युत्तर शिवसेनेला मिळाले आहे.

काय दिले भाजपने प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून आणि संजय राऊतांच्या ट्विटवर निशाणा साधत भाजपने ट्विटमध्ये लिहिले की, ''वह जिसने घर नहीं छोड़ा वह क्या मैदान में उतरेगा? देखा तुम्हारा असली चेहरा कोई बच्चा भी नहीं डरेगा. जय महाराष्ट्र आज फुस्की सभा" अशा शब्दात शिवसेनेला उत्तर देत डिवचले आहे.

आधी ३६ मालमत्ता होत्या, आता...

''आधी ३६ मालमत्ता होत्या, आता ५३ झाल्या. उद्धव साहेबांचा मावळा लवकरंच शतक साजरं करणार बहुतेक ! आजच्या सभेत मुख्यमंत्री@OfficeofUT यावर काही बोलणार का ? असा सवालही मुख्यमंत्र्यांना भाजपने आणखी एका ट्विटद्वारे केला आहे.

बातम्या आणखी आहेत...