आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी लोकांमधला ते माझ्यासोबत फोटो काढतात:ज्यांच्यासोबत लोक फोटो काढत नाही, त्यांना काय बोलणार?- मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी लोकांमधला, त्यामुळे लोक माझ्यासोबत फोटो काढतात. ज्यांच्यासोबत लोक फोटो काढत नाहीत त्यांना मी काय बोलू असा जोरदार टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांना लगावला.

मुंबईत आज गणेश विसर्जन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सहभाग घेतला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्यासोबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

आता सर्वच उत्सव धुमधडाक्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गणपतीचे विसर्जन आज होत आहे. जल्लोष खूप आहे. गत दोन वर्षांपासूनची मरगळ संपली. गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. आता नवरात्रोत्सवही धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्यात पुरामुळे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची घोषणा मी केली आहे.

विरोधकांना जोरदार टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी लोकांचा मुख्यमंत्री, मी त्यांच्यातीलच वाटतो. त्यामुळे ते माझ्यासोबत फोटो काढतात. ज्यांच्यासोबतस लोक फोटो काढत नाही त्यामुळे मी काय बोलणार? असा टोलाही विरोधकांना एकनाथ शिंदे यांनी लगावला. याकूब मेमन देशद्रोही होता. त्यामुळे त्याचे उदात्तीकरण नको. आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत आहोत.

आज टीका करायचा दिवस नाही- फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज काही टीका करायचा दिवस नाही. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती, म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. न्यायालयाचे दरवाजे मध्यरात्री उघडले, सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली. हे आमच्या सरकारच्या काळात झाले. मुंबईचा बाॅम्बस्फोट करणाऱ्यांना कोण संरक्षण देत आहेत हे आम्ही पाहिले त्यांचे साथी आज जेलमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...