आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठीचा आणि परप्रांतियांचाही मुद्दा पेटवला. त्यांना काही अंशी यात यशही आले; पण या मुद्यांचे निवडणूकीत मतांमध्ये परिवर्तन करता आले नाही. उलट राज्यभर या पक्षाची पिछेहाट झाली. पण आता राज यांनी पुन्हा चूल पेटवत हिंदुत्वाचा मुद्दा तापवला. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचा राज ठाकरेंना भक्कम पाठींबा मिळाला आहे, अशी महत्वपुर्ण माहिती 'दिव्य मराठी'ला पोलिसांच्या विशेष शाखेतील सुत्रांनी दिली.
राज ठाकरे यांनी ठाणे आणि शिवतिर्थावरील सभेत मराठीचा मुद्दा सोडून अचानक आपली भूमिका बदलली. त्यांनी या दोन्ही सभेत बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेसोबत जाऊन हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेला. बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने विधान केले त्या पद्धतीने त्यांनी एक-एक विधान सभेत बोलून दाखविले असून पर्यायाने हिंदुत्ववादी आणि संघटनाही त्यांच्याकडे आकर्षिक झाल्या आहेत.
राज यांच्या मुद्द्यांना हिंदुत्ववादी संघटनांचा पाठींबा
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच मराठी ते हिंदुत्व असा प्रवास करून धार्मिक मुद्द्याला हात घालून लोकांच्या भावना जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्ही जेही करता आहात धर्मासाठी चांगले करीत आहात अशी हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका आहे अशी भूमिकाच हिंदुत्ववादी संघटनांची असल्याची माहितीही सुत्रांनी दिली.
राज आणि हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका एकच
औरंगाबाद पोलिसही हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आहेत. त्यांच्यातील अंतर्गत बाबींची माहितीही पोलिस घेत आहेत. त्यातून ही माहिती समोर आली आहे. काही हिंदुत्ववादी संघटना आधीपासूनच भोंग्याचा मुद्दा वाजवत आहे. राज ठाकरे यांचे याबाबत जाहीर वक्तव्य आणि ठोस भूमिका या संघटनांसाठी पाठबळ असून त्यामुळेच तेही राज ठाकरे यांच्याकडे आकर्षित झाले आहेत.
सभेत आरएसएस, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचीही हजेरी
राज यांच्या भूमिकेला शिवसेना वगळता सर्वच हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचा पाठींबा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वदूरहून आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, बजरंग दल, इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही सभेला हजेरी लावली असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
सभा सुरळीत होण्यासाठी पोलिसांचे 2 प्लॅन
राज ठाकरे यांची सभा सुरळीत पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलिसांचे गोपनिय पथक, गुन्हे शाखा आणि एसआयडी विभागाकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. व्हिआयपी कोण असेल, कुणाला कुठे बसवायचे याचेही नियोजन पोलिसांनी केले आहे.
पाॅईंट टु पाॅईंट ब्लाॅक
गर्दी होणार नाही, गडबड होणार नाही, चेंगरा-चेंगरी होणार नाही यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. महत्वाच्या ठिकाणी बॅरीकेट्स लावण्यात आले असून इंट्री आणि आऊट पाॅईंटवरही गस्त असून प्रत्येक ठिकाणी पाॅईंट टू पाॅईंट ब्लाॅक केले आहे. वाहने जाण्यासाठी अडथळा होणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली आहे.
दोन प्लॅन तयार
आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांचा प्लॅन B तयार असून पोलिस प्लॅन A नुसार नियोजन करीत आहेत. राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने त्यांच्या दिमतीला स्काॅटींग आणि चारही बाजूने कव्हरअप करण्यासाठी गाड्या असून पायलटही सोबत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईचीच स्काॅटींग आहे. अचानक काही अनुचित प्रकार घडल्यास B प्लॅनचा वापर केला जाणार आहे पण हे प्लॅन आम्ही सांगू शकत नाही असेही पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.