आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांना प्रत्युत्तर:भाजपला राष्ट्रवादीसोबत जायचे असे भाजपने कधी म्हटले, सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवारांना सवाल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपसोबत जाणार नाही, शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कधीच म्हणालो नाही की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे आहे. राज्यात 2024 ला भाजपचे बहुमताचे सरकार येईल असे आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे. असा टोला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांना यावेळी लगावला आहे.

यावेळी बोलताना पवारांना महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या मुद्दे सोडून केवळ 12 आमदारांच्या आणि संजय राऊत यांचे मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्रातील विकास होणार आहे का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात राज्यातील जनतेमध्ये आक्रोश आहे. राज्यातील जनतेचे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा होऊ शकली असती. शेतकऱ्यांचे वीज तोडणीचा मुद्दा आहे, वैधानिक मंडळाचे प्रश्न, आणि वीज कामगारांचे आंदोलन, एसटी कामगारांचे आंदोलनाचा असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्यावर चर्चा होऊ शकली असती, असा टोला यावेळी मुनगंटीवार यांनी शरद पवारांना लगावला आहे. महिलांवरील अत्याचार असेल तर भ्रष्टाचार असेल असे अनेक मुद्दे राज्य सरकाकडे आहेत. यावर काम करायला हवे आम्हाला राष्ट्रवादीसोबत जाण्याची काही गरज नाही, असेही यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार महाविकास आघाडीचे मुख्य नेते आहेत. त्यांच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे मुद्दे हे संजय राऊत आणि 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आमच्या दृष्टीने राज्यातील केंद्राशी निगडीत जे प्रश्न आहे, त्यावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला आहे. विधान परिषदेसाठी असलेले 12 आमदार आणि त्यासाठी असलेला आग्रहपेक्षा मराठी भाषेला अभिजात दर्जा असेल याविषयावर त्यांनी आग्रह केला असता तर जास्त आनंद झाला असता. पण ठीक आहे, त्यांच्यामते मराठी भाषा, कोकणाच्या वैधानिक विकास मंडळ, किंवा उत्तर महाराष्ट्राचे वैधानिक विकास मंडळ यापेक्षा संजय राऊत आणि 12 आमदारा यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे का? असा खोचक सवाल सुधीर मुनगंटीवार यांना केला आहे.

भाजप धमकी देत नाही, संजय राऊतांनी दिली
देवेंद्र फडणवीस नागपुरात कसे जातील अशी धमकी संजय राऊत यांनी दिली होती, असा आरोप यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी केला आहे. भाजपच कधीच कुणाला धमकी देत नाही असेही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत. बाप बेटे लवकरच आत जातील, भाजपचे शहाणे आत जातील अशा धमक्या शिवसेना देते आम्ही कधी देत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...