आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • When Kashmiri Bride Took Over The Storage, Reached Her In Laws' House With Her Husband By Driving The Car, Photos Are Going Viral; News And Live Updates

कार चालवत सासरी पोहचली वधू:काश्मिरी वधूने लग्नानंतर वराच्या सांगण्यावरून स्टीयरिंग घेतले हाती, फोटो होत आहेत व्हायरल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बारामुल्ला जिल्ह्यातील डेलिनामध्ये हा विवाह

सोशल मीडियावर सध्या काश्मीरमधील लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. कारण तुम्ही सर्वत्र पाहत आले असाल की, लग्नानंतर वधू रडत रडत सासरी जाते. ते क्षण खूपच भावूक असते. परंतु, काश्मीरमध्ये याउलट घडले आहे. लग्नानंतर वधू आपल्या वराच्या सांगण्यावरुन गाडी चालवत सासरी पोहचली आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोचे कौतूकही तेवढ्या मोठ्या प्रमाणार केल्या जात आहेत.

बारामुल्ला जिल्ह्यातील डेलिनामध्ये हा विवाह
काश्मीरमधील लग्नाची ही गोष्ट उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील डेलिना येथील आहे. सना वानी आणि आमिर शेख यांच्या लग्नसोहळ्याची ही गोष्ट आहे. लग्नाच्या वेळी वातावरण सहसा उदास असते. वधू आपल्या कुटुंबासोबत रडताना दिसते. परंतु, काश्मीरमधील हे प्रकरण थोडे उलटेच पाहायला मिळाले. वधून वराच्या सांगण्यावरुन गाडीची स्टीयरिंग हाती घेत सासरी पोहचली. यामुळे याचे सर्वत्र आणि सोशल मीडियावर कौतूक केले जात आहे.

स्वत: गाडी चालवत सासरी जाताना सना.
स्वत: गाडी चालवत सासरी जाताना सना.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत फोटो
काश्मीरमधील लग्नाचे हे फोटो काश्मिरी समाजाच्या पारंपारिक चालीरितीशी जुळत नाहीये. परंतु, सोशल मीडियावर हे जोरदार व्हायरल होत आहे. लोक महिला सक्षमीकरणाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत आहे.

पतीसोबत कार चालवताना सना वानी.
पतीसोबत कार चालवताना सना वानी.

सनाचे काय म्हणणे आहे?
या सर्व प्रकरणावर सना म्हणाली की, 'जेव्हा आम्ही आमच्या पालकांचे घर सोडले, तेव्हा माझ्या पतीने मला तु गाडी चालवू शकते का? असे विचारले. मी देखील ही ऑफर स्वीकारली आणि गाडी चालवत सासरी पोहचली. मला पाहून माझे सासू आणि सासरे प्रचंड आनंदी झाले. त्यांनी मला महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी उभे राहायले हवे असे सांगितले. सना सध्या पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...